Click Here...👇👇👇

मॉर्निंग वॉक ने केला घात; अज्ञात वाहनाच्या धडकेत २ युवक ठार.

Bhairav Diwase
1 minute read

दोन्ही युवक करीत होते रोडच्या बाजूला व्यायाम, सकळी ४.१५ ची घटना.
Bhairav Diwase. Oct 09, 2020
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी आरमोरी रोड वर आज सकाळी ४.१५ च्या दरम्यान खरकाडा येथील रोहित अशोक चट्टे वय २० वर्ष व प्रशांत मुरलीधर सहारे वय २० वर्ष दररोज नियमा प्रमाणे सकाळी व्यायाम करासाठी गेले होते. नंतर ते रोडच्या लगत व्यायाम करीत असतांना एक अज्ञात वाहन ब्रम्हपुरी कडून आरमोरी कडे भरधाव वेगाने जात असताना या दोन्ही युवकांना धडक दिली व पसार झाला.

या धडकेत रोहित याच्या शरीराचे अक्षरशा तुकडे झाले. तर प्रशांत च्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने दोघेही जागीच ठार झाले. रोहित व प्रशांत हे दोघेही जिवलग मित्र असल्याची माहिती मिळली आहे. त्यांचा स्वभाव हा अत्यंत मन मिळवू होता ते आत्ताच १२ च्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले होते. त्यांच्या जाण्याने खरकडा गावात शोककळा पसरली आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.