⭕महात्मा फुले समता परिषदेचे तालुकाध्यक्ष भुजंग ढोले यांच्या निवेदनाची आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी घेतली दखल.
⭕आ. सुधीर मुनगंटीवार यांनी माळी समाज बांधवांना दिलेला शब्द केला पूर्ण.
⭕महात्मा फुले समता परिषदेने मानले आ. सुधीरभाउंचे आभार.
पोंभुर्णा:- पोंभुर्णा येथील वार्ड क्र. १४ मधील सामाजिक सभागृहाचे बांधकाम थंड बस्त्यात पडलेले आहे. सामाजिक सभागृहाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे अशा आशयाचे निवेदन महात्मा फुले समता परिषदेचे पोंभुर्णा तालुकाध्यक्ष भुजंग ढोले यांनी मुख्य अधिकारीकडे केलेल्या निवेदनात महटले आहे.
हेही वाचा:- पोंभुर्णा येथे 80 लक्ष रू. किंमतीचे महात्मा ज्योतीराव फुले सभागृह साकारणार. http://www.adharnewsnetwork.com/2020/10/80.html?m=1
या निवेदनाची दखल घेत मा. आम. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी या गोष्टीचा सतत पाठ पुरावा करीत चंद्रपुर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथील वार्ड क्र १४ मधील ८० लक्ष किमतीच्या महात्मा ज्योतिराव फुले सभागृहाचे बांधकाम मंजूर करण्यात आले असुन त्याचे बांधकामाला लवकरच सुरुवात होणार आहे.
आ. सुधीर भाऊ यानी दिलेल्या शब्दांची वचनपूर्तता केल्यामुळे पोंभुर्णा येथील संपूर्ण माळी समजाने आ. सुधीर भाऊंचे आभार व्यक्त केले आहे.