(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) किशोर माहोरकर फुटाना, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- गावात खेळीमेळीचे वातावरण निर्माण होत आहे. अशा या वातावरणात आज गावातील मुलं बालगोपाळ आपले ध्येय मनात ठेवून तयारी करत आहेत, आपल्या भविष्याची काळजी घेत आहे, आपल्या आरोग्याची काळजी घेत आहे, असेच एक दृश्य माझ्या (विनोद देशमुख) डोळ्यासमोर आले. सकाळी विनोद देशमुख पंचायत समिती सदस्य हे मॉर्निंग वॉक ला जात असताना, बालगोपाल मंडळ अनवाणी पायांनी सकाळी फिरायला जात होते, आणि त्याच वेळी बालगोपाळांच्या समोरून साप जाताना दिसला. बालगोपाळ अनवाणी पायाने फिरत आहे. त्यांना सापाने दंश करु शकते. असा प्रश्न विनोद देशमुख सदस्य यांना पडला. व त्या बालगोपाळांच्या आरोग्याची काळजी वाटू लागली. आणि विनोद देशमुख यांनी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या बालगोपाळांना स्वच्छेने मुलांना बूटच वाटप केले.
माझ्या सांगण्याचा एक च उद्देश की असे काही तुमच्या समोरील दृश्य तुम्हाला आढळल्यास इतरांची तुम्ही मदत कराल या उद्देशाने मला असं सांगाव वाटलं अशी काही मुले समोरचे भविष्य आहे त्यांची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. असे आधार न्यूज नेटवर्क च्या प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.