Click Here...👇👇👇

पडोली पोलिसांच्या धडक कारवाहीत तिन दारु तस्करांना अटक.

Bhairav Diwase
1 minute read
अवैध दारुचा ४ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त.
    Bhairav Diwase. Oct 08, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
 चंद्रपूर:- यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातुन चंद्रपुर येथे जात असताना बुधवारच्या रात्री गस्ती दरम्यान पडोली चौकात संशयित वाहन क्रमांक एमएच ३४ के ३३९६ या वाहनांची थांबवुन तपासणी केली असता ९०० नग देशी दारू आढळून आली.
  तर दुस-या कारवाहीत ऍक्टिव्हा वाहन क्रमांक एमएच ३४ एटी ९३०२ या वाहनास थांबवुन तपासणी केली असता २०० नग देशी दारू आढळून आली.
   तिस-या कारवाहीत ऍक्टिव्हा वाहन क्रमांक एमएच ३४ एबी ९९२२ या वाहनात 100 नग देशी अवैध दारू आढळून आली. 
अवैध दारूची किंमत १ लाख २० हजार व वाहनांची किंमत ३ लाख असा एकूण ४ लाख २० हजारांचा मुद्देमाल पडोली पोलिसांनी जप्त करून आरोपी गोविंद आडेवार रा. जलनगर चंद्रपूर, आदर्श राजेश सल्लमवार व रोहित छोटेलाल महतो रा.महाकाली चंद्रपूर या आरोपींवर गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली.
 ही कारवाई पडोली पोलीस स्टेशनचे ठानेदार मुरलीधर कासार व गुन्हे शोध पथकाने केली आहे.