चंद्रपूरच्या पारा १० अंश सेल्सिअसवर.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Nov 09, 2020

चंद्रपुर:- राज्यात रविवारी चंद्रपूर शहराचे किमान तापमान 10 अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, सर्वच शहराचे किमान तापमान दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढत आहे. विदर्भापाठोपाठ मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्याच्याही किमान तापमानात वेगाने घट होत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून राज्यात सर्वत्र थंडी जाणवू लागली असून, विदर्भाचा पारा वेगाने खाली घसरत आहे. यंदा ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस सुरू असल्याने थंडीचे आगमन उशिरा झाले. मात्र, आठच दिवसांत किमान तापमानात वेगाने घट होत आहे.

रविवारी चंद्रपूरचा पारा 10 अंशावर खाली आला.

त्या पाठोपाठ मराठवाड्यातील परभणी शहराचे किमान तापमान 12 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

गेल्या चोवीस तासांचे किमान तापमान . (अंश सेल्सिअस मध्ये)

विदर्भ : चंद्रपूर (10 ), गोंदिया (12.2), नागपूर (13.4), वाशिम (13.4), ब्रम्हपुरी (14.3), बुलढाणा (15), अमरावती (13.3), अकोला (13.2)
मध्य महाराष्ट्र : पुणे ( 14.6), जळगाव (13), कोल्हापूर (20.8), महाबळेश्वर( 15.6), मालेगाव (14.4), नाशिक (13.6), सांगली (20.2), सातारा ( 18.8) सोलापूर ( 17.8)
मराठवाडा : औरंगाबाद ( 14.4) परभणी (12), नांदेड ( 16)
कोकण : मुंबई ( 25.4) रत्नागिरी ( 24.2).