चंद्रपूर:- आज सकाळी ९ वाजता दरम्यान प्रेम दिलीप गेडाम (२१) रा.अमराई वार्ड, घुग्घुस याचा म्रुतदेह नदीच्या पात्रात दिसताच नागरिकांनी हि माहिती जयेंद्र महादेव निखाडे (५१) रा. चिंचोली यांना दिली त्यांनी पोहुन म्रुतदेह बाहेर काढला.
चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे भाजपा नेते विनोद चौधरी, अजय आमटे, शरद गेडाम, तुलसीदास ढवस यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सहा.पो.नि. गोरक्षनाथ नागलोत, मंगेश निरंजने यांनी पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी म्रुतदेह उत्तरनिय तपासणी करीता पाठवले आहे.
रविवारला प्रचल प्रशांत वानखेडे (१५) रा. वार्ड क्र.२ घुग्घुस हा प्रथमेश काँन्व्हेट येथे दहाव्या वर्गात शिकनारा मुलाचा म्रूतदेह आढळला तर अर्ध्या तासातच प्रुथ्विराज पुंडलीक आसुटकर (२१) रा. वार्ड क्र २ घुग्घुस या दोन युवकाचा म्रूतदेह आढळला होता. पोलिसांनी पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठविला होता.