(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- गेल्या बऱ्याच दिवसापासून चिकनगुण्या आटोक्यात न आल्याने चर्चतील आरोग्य केन्द्र व पाटण ते टाटाकोहाड रस्त्यावर आपघात झाला असता डॉक्टर उपलब्ध नसल्याने व रुग्णाच्या दुरवस्थेमुळे बऱ्याच दिवसापासून चर्चचा विषय ठरलेले पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आम आदमी पार्टी जिवती तालुका आध्यक्ष श्री.मारोती पुरी, उपाध्यक्ष श्नी. सुनील राठोड , सचिव श्री.गोविंद गोरे,श्री. बाबू पवार आदी कार्यकर्त्यांनी रुग्णलयाला पत्र देऊन रुग्णलयात रुग्णाची दुरावस्था व्हयला नको व रुग्णालयाला कायमस्वरूपी डॉक्टर दयावा याबद्दल कळविले. व पंचायत समिती सभापती सौ.अंजना पवार यांनाही रुग्णलयातील दुरावस्थे बदल कळविले असता,त्यांनी त्यावर तातडीने उपाययोजना करू असे सांगितले व अखेर आप च्या प्रयत्नाला व सभापती यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले व रुग्णालयात कायस्वरूपी डॉक्टर मिळाल्याने स्थानिका मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले झाले आहे.