2021ची केंद्र सरकारने ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी.
मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करु नका.
बल्लारपूर:- कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा बल्लारपुर तर्फे आयोजित ओबीसी आरक्षण बचाव परीषद आज (दि.20) ला स्थानिक बामणी येथील बालाजी हायस्कूल समोर निवलकर लॉन येथे संपन्न झाली.
यावेळी अध्यक्ष बबनराव फंड, उद्घाटक डॉ. बबनराव तायवाडे, स्वागताध्यक्ष सुभाष ताजने, प्रमुख अतीथी डॉ. अशोक जिवतोडे, दिनेश चोखारे, सचिन राजुरकर, रणजित डवरे, प्रा. शरद वानखेडे, शकील पटेल, वैशालिताई बुद्दलवार कल्पना मानकर, योगिता लांडगे, विजय मालेकर, रमेश पीपरे, श्याम लेडे, गोविन्दा पोडे,वसंत खेडेकर, दिलीप सोळुंके व तसेच प्रमुख उपस्थिती राजेंद्र खाडे सर सुहास ठावरी, सुरेश साळवे, योगेश पोतराजे , खैर कुणबी तालुका अदक्ष्य सुधीर कोरडे ,प्रसिद्धी प्रमुख राजेश खेडेकर, प्रनय दादा काकडे ,रमेश भाऊ मोहितकर, अक्षय देरकर, सहदेव देरकर, श्रीकांत जीवतोडे, विनोद मोरे,दिलीप काटोले, दादाजी बटटे,सचिन बर्डे,अतुल बांदूरकर, आशीष बटटे तसेच ओबीसी महिला सविता गणपती मोरे, सुरेखा देरकर, सत्यशीला साळवे, शारदा ठेंगने, मंदा वागदरकर, रुचिता नारले, लताबाई पोतराजे, सुनीता कुशवाह, विमल शारदा ठेंगणे, मंदा वागदरकर ,सोनटक्के,उपस्थित होते
केंद्र सरकारने 2021 ची जनगणना करावी, व राज्याने सुद्धा करावी, मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करु नका, विदर्भातील नऊ जिल्ह्यातील ओबीसी आरक्षण पुर्ववत करावे, यासह 21 मागण्यांसाठी ठराव पारीत करण्यात आला. प्रस्तावित सुरेश पंद्दीवार,संचालन गजानन चिंचोलकर, आभार प्रदर्शन राजेश बट्टे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष गणपती मोरे , उपअदक्ष्य कार्तिक जीवतोडे, सदस्य वैभव साळवे, ज्ञानेश देरकर, उमेश सपाटे, सुभाष काळे,सूर्यकांत साळवे, यांनी प्रयतन्य केले.