राष्ट्रीय एकात्मता ह्या देशाची खरी ताकत.

Bhairav Diwase
शेर-ए-हिंद-शेर-ए-म्हैसूर टिपू सुलतान यांची २७०  वी जयंती  शेणगाव ता. जिवती येथे  मोठय़ा उत्साहात साजरी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- शेर-ए-हिंद-शेर-ए-म्हैसूर टिपू सुलतान यांची २७०  वी जयंती  शेणगाव ता.जिवती येथे  मोठय़ा उत्साहात साजरी झाली. यानिमित्ताने शेणगाव तसेच आसपास च्या परिसरातील हजरत टिपू सुलतान फाउंडेशन शेणगाव च्या वतीने प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे उद्घाटक इंजि.अमजद शेख देशाची एकात्मता हि देशाची खरी ताकद असून शहिद टिपु सुलतान, छत्रपती शिवाजी महाराज, विर बिरसा मुंडा हे आधुनिक भारताचे खरे हिरो आहेत असे सांगितले , तसेच युवकांनी जाती-धर्म, जात-पंथ बाजूला सारून अशा महापुरुषांच्या विचारांशी निगडीत होऊन समाजकार्य करुण समाजात एकोपा निर्माण करावा.तसेच बलशाली भारत होण्यासाठी एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी काम करावे असे मत मांडले आणि शहिद टिपु सुलतान हे नेहमीच धर्मनिरपेक्ष राजे म्हणून ओळखले जातील कारण त्यांनी त्यांच्या राज्यात १५६ मंदिरांना देणग्या तसेच जमिनी दिली. फक्त मंदिरानाच नाही तर चर्च आणि मस्जिदींनाही जागा आणि देणग्या दिल्या. हे ईतिहासात नमूद आहे.१५६ मंदिरांना देणगी देनारा राजा हा केवळ धर्मनिरपेक्ष च असु शकतो असेही मत मांडले.

          कार्यक्रमाचे प्रमुख वक़्क्ते मा.अनिल दहागांवकरांनी आपले मत मांडताना असे सांगितले की युवकांनी एकत्र येऊन अशी फळी निर्माण केली पाहिजे UPSC, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा मध्ये जास्तीत जास्त स्पर्ध कांणी सहभाग नोंदवून आपला एक ठसा उमटवला पाहिजे. असे अनिल दहागांवकर यांनी सांगितले. 

       कार्यक्रमाचे अध्यक्ष सोहेल रजा शेख यांनी आपले भाषण देताना सांगितले की, हजरत टिपु सुलतान फाऊंडेशन गेल्या५ वर्षापूर्वी जे कार्य सुरू केले होते. एक छोटस रोपट जे हजरत टिपु सुलतान फाऊंडेशन ने लावल होत ते आज खूप मोठ झाले ल आहे त्याच झाडात रुपांतर झाल्यानंतर ते झाड अधिक प्रमाणात जिल्ह्यात तसेच जिल्हयाबाहेर पसरले आहे आणि हजरत टिपु सुलतान फाऊंडेशन तर्फे केल्या जाणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा उल्लेख करित खूप स्तूती केली.
  
      प्रास्ताविक ताजीम बेग  यांनी केले. आभार मोहसीन पठान  यांनी मांडले तर सूत्र संचालन रब्बानी पठाण यांनी केले. सदर कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी हजरत टिपू सुलतान फाउंडेशन जिवती चे तालुका अध्यक्ष इमरान शेख तसेच हजरत टिपु सुलतान कोर कमेटीने अहोरात्र कष्ट घेतले.