गडचांदूर शहरातील मोकाट डुकरांनी घेतला एकाचा बळी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Dec 16, 2020
कोरपना:- नगरपरिषद प्रशासन मागील अनेक वर्षापासून चुकीच्या नियोजनामुळे नेहमीच प्रकाशझोतात असून कित्तेक महिन्यापासून शहरातील डुकरांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी शहरातील सुजाण नागरिक करीत असताना सुद्धा नगरपरिषद प्रशासनातील अधिकारी आणि पदाधिकारी यांनी दखल घेतली नाही पर्यायाने डुकरांची संख्या वाढल्याने दिनांक 13/12/2020 रोजी सार्वजनीक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर खुलेआम फिरत असणाऱ्या डुकरांच्या धडकेत शामसुंदर बोबडे या तरुण व्यक्तीला मोठी दुखापत झाली दरम्यान काल दिनांक 15/12/20 ला शामसुंदर बोबडे यांचा म्रुत्यु झाला त्यामूळे यासाठी जबाबदार गडचांदूर नगरपरिषद अधिकारी पदाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.


           गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये अनेक वार्डात डुक्करांचा त्रास होत आहें पण गडचांदूर नगरपरिषद प्रशासनाने लक्ष दिले नसल्यामुळे हा अपघात घडला आहे.शहरातील प्रतिष्ठित नागरिक विजय ठाकूरवार यांनी अनेकदा व्हाट्सअप ग्रूप मध्ये ‘ आज के ताजे सूवर’ अशा मथळ्याखाली आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून पण नगर परिषद तर्फे या मोकाट डुक्करावर काही उपाय योजना केल्या जात नाही त्यामुळे एकां सर्व साधारण व्यक्ती ला त्याचा जीव गमवावा लागला ही अतिशय दुःखद घटना आहे आणि याची जबाबदारी गडचांदूर नगरपरिषद प्रशासनाची असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे.