काळे कृषी कायदे रद्द करा; राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेची मागणी

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- केंद्र शासनाने कृषी क्षेत्राशी संबधित विधेयक मंजूर केले आहेत.हे विधेयक रद्द करावे या मागणीला घेत देशभरातील शेतकरी पेटून उठले आहेत. या आंदोलनाला सर्वस्तरातून मोठा पाठिंबा मिळत आहे.शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा गोंडपिपरीचे अध्यक्ष आकाश चौधरी यांच्या नेतृत्वात महामहीम राष्ट्रपती महोदयांना तहसिलदारामार्फत दिलेल्या निवेदनातून केली आहे.
  

         एकीकडे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव आंदोलन करित असतांना सरकार मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिरंगाई करीत आहे.एवढेच नाही तर केंद्र सरकारमधील काही मंत्री आंदोलक शेतकऱ्यांना पाकिस्तानी संबोधून शेतकरी बांधवांचा अपमान केला आहे. देशातील तमाम शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने कृषी विधेयक तातडीन मागे घ्यावे अशी मागणी किसान सभा गोंडपिपरीने केली आहे.या प्रसंगी किसान सभा गोंडपिपरीचे अध्यक्ष आकाश चौधरी, रायुकाचे जयेश कारपेनवार, संतोष खोब्रागडे,किशोर चौधरी,मोरेश्वर खरबनकार यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.