देशी व विदेशी दारूसाठा जप्त एक आरोपी अटकेत.

Bhairav Diwase
तीन लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त.
Bhairav Diwase. Dec 01, 2020
भद्रावती:- नागपूर वरून चंद्रपूर मार्गे अवैधरित्या दारूची वाहतूक करीत असताना नाका-बंदी दरम्यान पोलिसांनी वाहनासह 3 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई सोमवारला रात्र दरम्यान करण्यात आली. आकाश महादेव खंडाळकर वय २७ राहणार भद्रनाग वार्ड असे आरोपीचे नाव असून हा गेल्या कित्येक दिवसापासून या परिसरात अवैध दारूचा व्यवसाय करीत आहे गाडी क्रमांक एम एच १४ डी टी ५४५३ या वाहनाने नागपूरहून चंद्रपूर कडे देशी व विदेशी दारूसाठा आणीत असल्याची भद्रावती पोलिसांना गुप्त माहिती मिळाली त्या आधारे सुमठाणा परिसरात नाकाबंदी करून वाहनासह आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ९० हजाराचा दारू साठा व वाहन असा तीन लाख ९० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार सुनील सिंग पवार यांच्या मार्गदर्शनात केशव चिटगिरे, शशांक बदामवार, निकेश ढेंगे, रोहित चीटगिरे, दिलीप लभाने यांनी केली.