वाघाच्या हल्ल्यात एका युवकाचा व दोन बकऱ्यांचा मृत्यू.

Bhairav Diwase
केमारा पासून एक किलोमीटर अंतरावर ची घटना.
Bhairav Diwase. Dec 02, 2020
पोंभूर्णा:- मिळालेल्या माहितीनुसार पोंभुर्णा तालुक्यातील केमारा येथे एक युवक केमारा पासून एक किलोमीटर अंतरावर बकऱ्या राखण्यासाठी गेला होता. लपून बसलेल्या वाघाच्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन बकऱ्यांचा पण मृत्यू झाला हि घटना 3:30 वाजताच्या सुमारास घडली.

मृतक युवकांचे नाव सुचित नेवारे (वय१७) आहे. घटनास्थळी फॉरेस्ट चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित झाले. असून पंचनामा सुरू आहे व पुढील तपास कोठारी पोलीस करणार आहे.