भारतीय जनता पक्षाला जास्तीत जास्त ग्रामपंचायत निवडणूकित यश मिळवून दया:-माजी आमदार अँड.संजय धोटे.
भाजपाचे १० ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध विजयी.
नारंडा येथे भाजपाच्या बिनविरोध विजयी उमेदवारांचा स्वागत व सत्कार.
शेरज खुर्द ग्रामपंचायत भाजपाच्या ताब्यात.
सांगोडा,वनोजा,कढोली खुर्द,कोडशी खुर्द येथील प्रत्येकी एक सदस्य भाजपाचा बिनविरोध विजयी.
कोरपना:- कोरपना तालुक्यातील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकित भारतीय जनता पक्षाची दमदार सुरवात झाली असुन भारतीय जनता पक्षाचे १० सदस्य बिनविरोध निवडूण आलेले आहेत.
यावेळी नारंडा येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,भाजपा युवा नेते संदीप शेरकी, सुरेश पाटील परसुटकर,नागोबा पाटील उरकुडे उपस्थित होते.
सांगोडा येथील नवनाथ ढवस, वनोजा येथील प्रवीण हेकाड, कढोली खुर्द येथील सौ.गीताताई विठ्ठल जुनघरी, कोडशी खुर्द येथील गणेश पायतडे, शेरज खुर्द येथील ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आली असून याकरिता संतोष हुलके, ज्ञानेश्वर महात्मे, गिरीधर कोट्टे, नामदेव अहिरकर, सुशांत आत्राम अथक परिश्रम घेतले.
यावेळी शेरज खुर्द येथील ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तेजराज बापूराव बुचुंडे, अर्चना अविनाश हुलके,अनिता चंद्रकांत गेडाम, उज्ज्वला रमेश चिंचोलकर, अर्चना महेश गिलबिले, संदीप मोहन उराडे यांचा स्वागत व सत्कार अँड.संजयभाऊ धोटे यांच्या हस्ते करण्यात आला.
भारतीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करुन कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत जास्तीत जास्त यश मिळवून द्यावे व ग्रामीण भागातील विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कटिबद्ध राहू असे आवाहन अँड.संजय धोटे यांनी केले.
यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यवान चामाटे, अजय तिखट, अनिल मालेकर, प्रवीण हेपट, अरुण निरे, बाळा पावडे, अनिल शेंडे, गजानन चतुरकर, महेश बिल्लोरिया यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन अरविंद खाडे यांनी केले.