पोलिसांनी २४ तासात लावला खुनाचा छडा.
Bhairav Diwase. Jan 03, 2021
आधी हे वाचा
शेतशिवारात खून करून आरोपी फरार.
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नांदगाव येथील शंकर फोफरे ( वय 40) यांचा मृतदेह त्यांचे स्वतःच्या शेतात मौजा कोराडी येथे आढळून आला गडचांदूर पोलिसांनी घटना पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला व तपासणीला सुरुवात केली घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुशिल कुमार नायक व गडचांदूर चे थानेदार गोपाल भारती यांनी तपासाची सूत्र हातात घेत घटना परिस्थिती लक्षात घेता तपास सुरू केला.
प्रदीर्घ अनुभवाच्या आधारावर आरोपी कोणीतरी घरातीलच व्यक्ती आहे याचा आधार घेत चौकशीला सुरुवात केली शेवटी मुलानेच बापाचा आहे हे त्याच्या लक्षात आले शंकर भोकरे यांना एक मुलगा लहानपणापासूनच विकृत मनस्थितीचा असल्यामुळे मामाकडे पाठवण्यात आले मात्र मुलाचा स्वभाव बघता त्याला वडिलांनी नांदगाव ला बोलावून घेतले बिडी, सिगारेट, दारू या व्यसनाच्या आहारी मुलगा गेलेला आहे वडिलांच्या लक्षात आले होते.
घटनेच्या दिवशी आरोपीचा वर्ग बारावीचा पेपर होता मात्र अभ्यास झालेला नाही हे कारण दाखवत त्यांनी पेपरला दांडी मारली दुपारच्या सुमारास शेतात जेवण करत असताना वडिलांनी जाब विचारला असता बाजूला असलेल्या विळ्याने दहा-बारा वार करत वडिलांना यमसदनी पाठवले गडचांदूर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.
काही तासातच खुनाचा छडा लावला याबद्दल त्यांच्या कामगिरीची सुद्धा कौतुक केले जात आहे व पालकांनी आपल्या मुलाबाळांकडे त्याच्या वाईट वर्तणूक इकडे कटाक्षाने लक्ष देण्याची गरज समजून घ्यावी असे आव्हान सुद्धा गडचांदूर पोलिसांनी केले आहे
आरोपीचे नाव राहुल शंकर फोफरे वय (वीस वर्ष ) खुनाच्या आरोपाखाली भारतीय दंड संविधान 302 अन्वये गुन्हा दाखल व अटक करण्यात आली.