🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करू पाहणाऱ्या नाराधमावर कठोर कारवाई करा:- वनिता कानडे

भाजप महिला आघाडीची मागणी.

पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:-भद्रावती तालुक्यातील कोंढा येथे एका आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करू पाहणाऱ्या नराधम सुनील घुगुल याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी भाजपच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा वनिता कानडे यांनी भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनीलसिंग पवार यांच्याकडे एका शिष्टमंडळाद्वारे केली आहे.  त्वरित कारवाई न केल्यास भद्रावती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा ईशाराही देण्यात आला आहे. 

              भद्रावती तालुक्यातील कोंढा येथील सुनील घुगुल वय ३५ वर्ष या नराधमाने शेजारी राहणाऱ्या एका आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.  मात्र तेवढ्यात घरचे लोक आल्याने त्याने पळ काढला. तेव्हापासून तो अद्याप फरार आहे. या आरोपीचा त्वरित शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

                भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा वनिता कानडे यांच्या नेतृत्वात येथील भाजपा कार्यकर्त्यांनी  यासंदर्भात ठाणेदाराची भेट घेतली. यावेळी माजी पं.स.सभापती विद्या कांबळे, प्रणिता शेंडे, लता भोयर,  भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण सातपुते, महामंत्री किशोर गोवारदिपे, केतन शिंदे, निशांत देवगडे, उमेश शाह, सत्तार भाई, संतोष नागपुरे व माधव बांगळे आदींची उपस्थिती होती.