आठ दिवसापूर्वी झाले होते लग्न.
अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट.
चंद्रपूर:- आठ दिवसापूर्वी लग्न झालेल्या पडोलीच्या नवविवाहिताने आपल्या किरायाच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री 8.30 वाजता च्या दरम्यान घडली. भारती अंबादास अंबादे असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहिताचे नाव आहे.
ते दोघेही भंडारा जिल्ह्यातील असल्याचे समजते 24 तारखेला त्या युवतीशी पडोलीच्या पेट्रोल पंप वर काम करणाऱ्या युवकाशी लग्न झाले होते. 1 तारखेला पडोली ला दोघेही आले त्या दिवशी पती ड्युडीवर गेला व त्याच्या नंतर तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पडोली पोलिसांनी मर्ग दाखल करून शवविच्छेदना करीत पाठविला. शवविच्छेदना नंतर मृतदेह भंडारा येथील घरी नेउन अंत्यसंस्कार करण्यात आला. आत्महत्येचे नेमके कारण कळले नाही पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे आहे.