घुग्गुस भाजपाच्या वतीने वीज देयक माफी साठी टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन.

Bhairav Diwase
नागरिकांना सहभागी होण्याचे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आवाहन.
Bhairav Diwase.     Feb 03, 2021
चंद्रपूर:- कोरोना काळात भरमसाठ विजबिल पाठवणाऱ्या व विज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून जनतेला अंधारात टाकण्याचे महापाप करणाऱ्या महविकास आघाडी सरकारच्या विरोधात "टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन" माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराजभय्या अहिर यांच्या मार्गदशनात व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी,घुग्घूसच्या वतीने दि. शुक्रवार 05/02/2021 वेळ: स.11 वाजता गांधी चौक, घुग्घूस येथे करण्यात येणार आहे.
नंतर घुग्गुस येथील वीज वितरण मंडळाच्या कार्यालयास टाळा ठोको आंदोलन करण्यात येणार आहे.
तरी घुग्गुस परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येत या आंदोलनात सहभागी होण्याचे आव्हान भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केले आहे.