निलेश देशमुख यांनी आपला जन्मदिवस अनोखा पध्दतीने केला साजरा....

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) धनराज कोहळे रैयतवारी (जांब), सावली
सावली:- काल दिनांक 01 फेब्रुवारी 2021 ला हरांबा येथील निलेश देशमुख यांनी आपला जन्मदिवस अनोखा पध्दतीने साजरा केला. काल सोमवार ला निलेश देशमुख यांचा वाढदिवस होता. त्यांनी वाढदिवसानिमित्याने जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील ब्लड बँक मध्ये जाऊन निलेशनी रक्तदान केले. निलेश देशमुख यांनी आजपर्यंत 10 वेळा स्वइच्छेने रक्तदान केले असून तसेच आजपर्यंत जवळपास 90 लोकांना रक्त मिळवून त्यांचं जीव वाचवण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. रक्तदान करतांवेळी सोबत सतिष तडकलवार (TRO), एन. जी. मोरे (रक्तपेढी तंत्रज्ञ), रविंद्र बंडावार उपस्थित होते. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल मित्रपरिवार तर्फे कौतुक केल्या जात आहे.