🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पो. हवालदार विजय झोडे व ॲड. रूपेश रणदिवे यांनी घडविले माणूसकीचे दर्शन.


Bhairav Diwase.       Feb 02, 2021
चंद्रपूर:- दि. 28 जानेवारी 2021 रोजी श्रीमती. कमलाबाई नारायण मुरमुरवार नामक ७५ वर्षाची निराधार वृध्द महिला रा. घुटकाळा वार्ड, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजुच्या रस्त्याने जात असतांना ती अचानक खाली कोसळली व तिला डाव्या डोळयाला गंभीर दुखापत झाली असे असतांना सुध्दा ती निराधार योजनेच्या प्रमाणपत्रासाठी धडपड करित होती. 


पो. हवालदार विजय झोडे....त्यावेळी लेबर कोर्ट येथे डयुटीवर असलेले पो. हवालदार विजय झोडे व ॲड. रूपेश रणदिवे यांनी तिला उचलुन तहसिल कार्यालय येथे नेले व तिचे निराधार योजनेसंबंधी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसिलदार राजु धांडे यांना हकीकत सांगीतली असता त्यांनी त्या महीलेचे काम लवकरच करून दिले. त्यानंतर तेथे उपस्थित असलेले रिक्षाचालक अवी व सामाजीक कार्यकर्ता तसेच गुरूजी फॉउंडेशन चे उपाध्यक्ष वैभव एनपल्लीवार यांनी त्या महिलेला दवाखान्यात नेले. व औषधोपचार करून घरी सोडलले. अशा प्रकारचे माणुसकीचे दर्शन चंद्रपुर येथे बघायला मिळाले.