Gadchiroli News : शिक्षक पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू

Bhairav Diwase
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे, जिथे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. गडचिरोली जिल्ह्यात १८ ऑगस्टपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने असन्तु सोमा तलांडी या शिक्षकाचा मृत्यू झाला. ते अंदाजे ४० वर्षांचे होते आणि जोनावाही, ता. भामरागड येथे राहत होते.


असन्तु सोमा तलांडी हे मागील अनेक वर्षांपासून पेरमिली येथील जिल्हा परिषदेच्या पल्ले शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. १८ ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यावर ते आपल्या गावी परतत असताना, सिपनपल्ली नाल्याच्या पुरामुळे ते वाहून गेले. स्थानिक प्रशासनाने १९ ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह शोधला. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.