खासदार बाळू धानोरकर व समर्थक भाडोत्री गुंडावर पत्रकार सरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करा,

Bhairav Diwase
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय आंदोलनकर्त्याची प्रशासनाकडे मागणी.
Bhairav Diwase.    Feb 01, 2021
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा चंद्रपूर जिल्हा सरचिटणिस तथा साप्ताहीक भुमीपूत्राची हाक (न्युज पोर्टल) चे संपादक राजू कुकडे यांनी खासदार बाळू धानोरकर यांच्यावर दैनिक सकाळ पोर्टलच्या फेसबुक वरील झालेल्या ट्रोल संदर्भात बातमी आपल्या न्युज पोर्टलवर दि.१७ जानेवारी ला प्रकाशित केली होती त्या बातमीमध्ये खासदार बाळू धानोरकर यांच्या विरोधात कुठलेही वक्तव्य नसतांना व फेसबुकवर झालेल्या ट्रोलचा संदर्भ घेत ती बातमी प्रकाशित झाली असतांना खासदार बाळु धानोरकरांनी भूमिपूत्राची हात न्यजु पोर्टलचे प्रतिनिधी प्रमोद गिरडकर यांना फोनवरून बातमी अशी का लिहिली? असा प्रश्न करून तुम्हा दोघांनाही चंद्रपूरला भेटतो म्हणून सांगीतले. दरम्यान खासदार बाळू धानोरकर यांच्या समर्थकांनी संपादक राजु कुकडे यांना फोनवर भेटण्याची व तुम्ही कुठे आहात म्हणून माहिती घेतली होती.


 दिनांक १८/०१/२०२१ ला सायंकाळी ७.०० च्या दरम्यान वरोरा येथील बोर्डा चौकातील हॉटेल राजयोग जवळ राजू कुकडे हे आपल्या चारचाकी वाहनांत बसत असतांनाच तीन अज्ञात इसमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला पण ते आपला जीव वाचविण्यासाठी हॉटेल राजयोगमध्ये घुसले असता आरोपी तेथेही आले व  "साल्या आमचे बाळूभाऊची बदनामी करतोस काय? असे म्हणत लाठ्याने वार करण्यास सुरुवात  केली व त्यांचे हात पकडून तु आता बाळू भाऊ कडे चाल असे म्हणून ओढत नेण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी झालेली गर्दी बघता आरोपी पळून गेले, दरम्यान राजू कुकडे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली पण वरोरा पोलीस स्टेशन येथे आरोपी हल्लेखोरांवर केवळ अदखलपात्र गुन्हे नोंद केले. 
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई व डिजिटल मीडिया असोसिएशन यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्यासह ग्रूहमंत्री अनिल देशमुख ,राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन मागील आठ दिवसांपूर्वी देण्यात आले पण तरीही हल्लेखोर आरोपी व खासदार धानोरकर यांच्यावर पत्रकार सरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला नाही हा पत्रकारांवर एक प्रकारे अन्याय आहे,

 या एकदिवसीय धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासन प्रशासनाला आणि विशेष करून पोलीस प्रशासनाला विनंती करण्यात येते की त्वरित हल्लेखोर आरोपी व त्यांना सुपारी देणाऱ्या खासदार बाळू धानोरकर यांच्यावर पत्रकार सरक्षण कायद्यांतर्गत गुन्हे नोंद करून अटक करण्यात यावी अन्यथा यापुढे सर्व पत्रकारांच्या संघटनामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असा इशारा आंदोलनकर्त्या पत्रकारांनी प्रशासनाला दिला आहे. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, डिजिटल मीडिया असोसिएशन, विदर्भ राज्य ग्रामीण शहरी पत्रकार संघ व बहुभाषिक पत्रकार संपादक बहुउद्देशीय संघाचे पदाधिकारी व पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते, या एकदिवसीय आंदोलनात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे, जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे, कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया, विदर्भ राज्य ग्रामीण शहरी पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष तथा lज्येष्ठ पत्रकार किशोर पोतनवार,पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर, जिल्हाध्यक्ष रूपेश निमसरकर,डिजिटल मीडिया असोसिएशन चे मनोहर दोथेपेल्ली,दिनेश ऐकवनकर,राजू बिट्टुरवार, संजय कन्नावार, रोहित तूरानकर,जयपाल गेडाम,बहुभाषिक पत्रकार संपादक बहुउद्देशीय संघाचे जिल्हाध्यक्ष कुमार जूलमूलवार,सचिव रकीब शेख, मनीषा ठुनेकर,सरिता मालू,संतोष कुकडकर,तंशिल पठाण, राजेश अलोने,नीलेश ठाकरे,विनोद पन्नासे,संजय तिवारी,अनुप यादव ,प्रभाकर आवारी,विनोद बोडके,सुदाम राठोड उपस्थित होते.