आज 218 कोरोनामुक्त.
गडचिरोली:- जिल्हयात 466 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 218 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 14485 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 11466 वर पोहचली. तसेच सद्या 2819 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 200 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे.
आज 15 नवीन मृत्यूमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील कढोली येथील 66 वर्षीय पुरुष, गडचिरोली जिल्ह्यातील गोकुलनगर येथील 43 वर्षीय महिला, गडचिरोली येथील नवेगाव कॉम्पलेक्स येथील 63 वर्षीय पुरुष, कुरखेडा तालुक्यातील 36 वर्षीय पुरुष, चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका नागभिड येथील 55 वर्षीय पुरुष, जिल्हा भंडारा ता. पवनी येथील 35 वर्षीय पुरुष , जिल्हा भंडारा ता. लाखांदुर येथील येथील 35 वर्षीय महिला, ता.कुरखेडा येथील 53 वर्षीय महिला, जिल्हा गडचिरोली गोकुलनगर येथील 48 वर्षीय पुरुष, आरमोरी तालुक्यातील 56 वर्षीय पुरुष, जिल्हा चंद्रपूर ता. ब्रम्हपुरी येथील 58 वर्षीय पुरुष, आरमोरी तालुक्यातील 60 वर्षीय महिला, गडचिरोली येथील 48 वर्षीय महिला, गडचिरोली येथीलच 55 वर्षीय पुरुष तर जिल्हा भंडारा तालुका लाखांदुर येथील 60 वर्षीय महिलेचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.16 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 19.46 टक्के तर मृत्यू दर 1.38 टक्के झाला.
नवीन 466 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 196, अहेरी तालुक्यातील 33, आरमोरी 35, भामरागड तालुक्यातील 5, चामोर्शी तालुक्यातील 24, धानोरा तालुक्यातील 8, एटापल्ली तालुक्यातील 21, कोरची तालुक्यातील 33, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 44, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 14, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 11 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 42 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 218 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 81, अहेरी 23, आरमोरी 11, भामरागड 30, चामोर्शी 06, धानोरा 13, एटापल्ली 13, सिरोंचा 12, कोरची 9, कुरखेडा 3, तसेच वडसा 17 येथील जणांचा समावेश आहे.