आदेशाचे उल्लंघन केल्यास वर-वधू पक्षावर गुन्हा तर तलाठी व ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई.
चंद्रपूर:- चंद्रपुर जिल्हा कार्यक्षेत्रात जमावबंदी व टाळेबंदीबाबत नियमावली आणि उपाययोजना दि. 14 एप्रिल, 2021 चे रात्री 08.00 ते दि 01 में, 2021 चे सकाळी 07.00 वाजेपर्यंतच्या कालावधीकरीता लागु केलेल्या आहेत. सध्या चंद्रपूर जिल्हयात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे, विशेषतः ग्रामीण भागात लग्न/विवाह समारंभामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करण्याचे प्रमाण दिसुन येत आहे, ज्यामुळे कोरोना साथरोग ग्रामीण भागात सुध्दा मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी एका आदेशान्वये लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 25 लोकांना उपस्थितीत राहण्यास परवानगी दिली आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित वर-वधु, त्यांचे आई-वडील, मंगल कार्यालय/लॉन/सभागृह मालक, कॅटरर्स यांचेवर नियमाप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात येईल तसेच संबंधित गावाचे तलाठी व ग्रामसेवक यांचेवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.