Top News

वासेरा येथील कांग्रेस कार्यकर्ते कडून कुटुंबाला आर्थिक मदत.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- वासेरा येथील वर कु.नाजुक अभिमन्यू पोवणकार व आवळगाव येथील वधु कु. दिपाली दिलीप मेश्राम यांचा विवाह सोहळा वधुमंडपी होण्याचा ठरला. त्यानुसार विवाह सोहळा नियोजित वेळेत व कोरोना नियमावली नुसार पार पडला.लग्नानंतर भोजन झाल्यानंतर वर वधुला आपल्या गावी नेण्यास तयारी करीत असतांनाच वराची प्रकृती अचानक खराब झाली व त्यातच दवाखान्यात पोहोचण्याअगोदर त्याची प्राणज्योत मालवली.

⭕लग्नानंतर नवरदेवाचा मृत्यू.
⛔संसार थाटण्यापूर्वीच झाला नववधूच्या सप्नांचा चुराडा.
👇👇👇👇👇👇👇👇

    ही वार्ता वासेरा या गावातील काॅग्रेस कार्यकर्ते यांच्याकडुन ना.विजयभाऊ वडेट्टीवार, बहुजन कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपुर यांना कळताच त्यांनी शोक व्यक्त केला. व मा. रमाकांतभाऊ लोधे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमेटीयांच्या मार्फत तात्काळ सांत्वना मदत पाठवली. यावेळेस गावातील ग्राम काॅग्रेस शिष्टमंडळ परशुरामजी बोरकर ,चंद्रशेखर हेमके, निशांत बंडीवार, महेन्द्र सुर्यवंशी, पुंडलिक डोंगरवार व इतर ग्रामवासीय उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने