मी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही:- भास्कर मत्ते (कढोली खुर्द ग्रामपंचायत सदस्य)

Bhairav Diwase
0
Bhairav Diwase. April 18, 2021

कोरपना:- कोरपना तालुक्यातील कढोली खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत आसन खुर्द येथील भास्कर मत्ते हे नुकत्याच झालेल्या निवडणूकीत निवडून आलेले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतकरी संघटना पक्षात केला असे काही वृत्तपत्रात वृत्त प्रकाशित केले होते, ते वृत्त अतिशय चुकीचे असून आपण कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही असे भास्कर मत्ते यांनी सांगितले.
             
       सदर वृत्त हे गावातील नागरिकांची दिशाभूल करणारे आहे. तसेच आपल्याला गावातील नागरिकांनी ज्या विश्वासाने निवडून दिले आपण त्याच विश्वासाने गावातील नागरिकांचे काम करू असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)