कोरोना महामारीत नव्या रोगांना आमंत्रण.
प्रीतम पाटणकर यांनी निर्दशानास आणून दिला प्रकार.
बल्लारपुर:- दिनांक रोजी 19/04/2021 ला स्वराज्य सामाजिक संघटना जि.चंद्रपूर /प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर विसापूर यांचा कडून ऑनलाईन मार्फत (व्हॅटप्प चा मार्गाने) व कॉल करून विसापूर ग्रामपंचायत कार्यालय मा. श्री सरपंच /उपसरपंच व सचिव साहेब यांना निवेदन पाठवून कळविण्यात आले.
विसापूर मध्ये वॉर्ड नं. 1 बल्लारपूर मार्ग पुरबुडी जवळ त्या भागा मध्ये मानवी बिमारी साठी वापर (उपरोगी) झालेले एक्सपायर इंजेक्शन त्या ठिकाणी रोडच्या बाजूला टाकण्यात आले आहेत. अशी माहित मा. श्री मधुकरजी भोयर यांनी दिली. स्वराज्य सामाजिक संघटना /प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर, विसापूर मध्ये असलेले सामाजिक कार्यकर्ता प्रितम पाटणकर यांनी तात्काळ ते उचलून विसापूर गावाच्या बाहेर टाकण्यात यावे. कारण तिथे त्या जवळ नागरिकांचे घर असल्यामुळे त्या रोड वरून शेतीकरी आपल्या शेतामध्ये जात असतात व लहान मुलं सुद्धा असतात. त्या भागात मध्ये गुरे जानावरे (प्राणी ) सुद्धा येणे-जाणे करती असतात. म्हणून त्या इंजेक्शनेच्या ढगामुळे कोणत्याही प्राण्यांना, नागरिकांना हानी/दुष्परिणाम होणार आहे. तात्काळ तिथून उचलून कुठे तरी गावाचं बाहेर टाकावे. अथवा त्याची विल्हेवाट लावली. असे निवेदनाच्या मार्फत सांगण्यात आले.
लवकरच समस्याचे निवारण होणार असे विसापूर ग्रामपंचायत उपसरपंच अंकेश्वर मेश्राम यांनी कॉल वर सांगितले आहेत.