Top News

चेक बल्लारपूर येथील हिराजी हेपटे यांचा कोरोनाने मृत्यू.

Bhairav Diwase. April 20, 2021
पोंभुर्णा:- देशात सगळीकडे कोरोनाने हाहाकार माजविला आहे. या वर्षी तर कोरोना च्या महामारीने कोण? कुठे? केव्हा? कसा? कधी? आपल्याला सोडून जाईल याचा नेम नाही. देशात व राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात चंद्रपुर जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरू झाल आहे. 1000 घ्या वरती रुग्णांची नोंद होत आहे. तर मृत्यू ची संख्या सुध्दा वाढत आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पोंभुर्णा तालुक्यातील चेक बल्लारपुर येथील हिराजी हेपटे (अंदाजे 42) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याने त्यांना गडचिरोली येथील (कोविड) रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु त्याचा उपचारांदरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले असुन गावात शोककळा पसरली आहे. भितीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी. घरीच रहा सुरक्षित रहा.

तसेच 21 एप्रिल पासून चंद्रपुर जिल्ह्यात जनता कर्फ्यु लावण्यात आला आहे. त्या नियमांचे काटेकोर पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. व वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने