🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

पोलिसांनी फिल्म स्टाईलने पाठलाग करुन पकडली दारू.

Bhairav Diwase. April 25, 2021
मुल:- मुल पोलीस ठाणे अंतर्गत बेबाळ पोलीस चौकीच्या हद्दीतील जुनगाव येथील दारू विक्रेता शेखर पाल याचा पाठलाग करून त्याचे कडून 90 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

       सध्या राज्यात व जिल्ह्यात कोरोना संसर्गाला रोखण्याच्या उपाययोजना युद्धपातळीवर सुरू असून कड्डक संचारबंदी लागू आहे. या संचार बंदी मुळे देशी व विदेशी दारू येणे व विक्री होणे बंद असल्यामुळे दारू विक्रेत्यांनी मोहाच्या व गुळाच्या दारूकडे आपला मोर्चा वळवला होता. नांदगाव, बेबाळ ,घोसरी,बोंडाळा इत्यादी गावातील दारू विक्रेते जुनगाव येथून शेखर पाल यांचेकडून दारूचा गोरख धंदा सुरू केला होता. पोलिसांच्या हिटलिस्टवर असलेला शेखर पाल हा शनिवारी रात्री नांदगाव कडे दार पोहोचता करून देत असताना, पोलिसांनी सापळा रचून त्याला आडवले असता त्याचेकडे दुचाकी वाहनावर सत्तर लिटर मोहाची दारू आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून दुचाकीसह 90 हजाराचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक प्रशांत ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली परचाके मेजर, जुमनाके मेजर, पोलीस मित्र सिद्धू फडके यांच्या पथकाने केली.
पोलिसांच्या या कारवाईने अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. तर पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत