Top News

दालमिया सिमेंट कंपनीतर्फे पहिले ५१ सिमेंट बॅग नारंडा येथील भवानी मंदिरास भेट.

नारंड्याच्या सरपंच सौ. अनुताई ताजने यांनी मानले कंपनी प्रशासनाचे आभार.
Bhairav Diwase. April 25, 2021
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनी मागील काही महिन्यांपूर्वी सुरू झाली असून सद्या सिमेंट कंपनीचे उत्पादन सुरू करण्यात आलेले आहे.तरी कंपनीचे कार्यकारी संचालक हक्कीमुद्दीन अली व कंपनीचे शाखा प्रबंधक सुनील भुसारी यांच्या पुढाकाराने कंपनी मध्ये उत्पादन झालेले पहिले ५१ बॅग्स सिमेंट नारंडा गावातील आराध्य दैवत भवानी माता मंदिराच्या जीर्णोद्धाराकरिता भेट दिलेले आहे.
सदर कंपनी हि मागील ५ वर्षांपासून बंद अवस्थेत होती सदर कंपनी ही दालमिया भारत समूहाने विकत घेतली असून सद्यस्थितीत कंपनीचे उत्पादन सुरू झालेले आहे.त्यामुळे गावातील भवानी माता मंदिरास उत्पादनातील पहिले ५१ बॅग्स सिमेंट भेट दिलेले आहे.
यावेळी कंपनी मधून सिमेंट भरलेली पहिली गाडी निघताना पूजा करण्यात आली. यावेळी एचआर प्रमुख उमेश कोल्हटकर, राजेश जुनोनकर, चंद्रदीप टामटा, मरगडे सर, चंदेलीयन सर, प्रशांत भीमनवार, गौरव वांढरे यांची उपस्थिती होती.
यावेळी भवानी मंदिराच्या जिर्णोद्धाराकरीता सिमेंट भेट दिल्याबद्दल नारंडा गावच्या सरपंच अनुताई ताजने, उपसरपंच बाळा पावडे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सिमेंट कंपनीचे आभार व्यक्त केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने