🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

जम्बो रुग्णालय व अद्यावत रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची सचिन डोहे यांची मागणी.

सीमेंट उद्योग व वेकोली च्या सामाजिक दायित्व निधीतून मदत करण्याचे आवाहन

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- विश्वाला कोविड -१९ या महामारीने ग्रासले आहे. सर्वत्र ऑक्सिजन व रेडमिशिविर इंजेक्शन सह ऑक्सिजन बेड ची कमतरता मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहे. चंद्रपुर जिल्ह्यात कोविड -१९ ची वाढती रुग्णसंख्या बघता जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबवील्या जात आहेत. राजुरा उपविभागिय क्षेत्रात अनेक गावे कोरोणा हॉटस्पॉट झालेले आहे. या सर्वांचा ताण चंद्रपुर येथील आरोग्य यंत्रणेवर आला आहे. परिणामी आरोग्य सेवा अपुरी पडत आहे. त्यामुळे सीमेंट उद्योग व वेकोली च्या सामाजिक दायित्व नीधीतुन ( सी.एस.आर.) मधून राजुरा येथे जम्बो रुग्णालयाची निर्मिती व अद्यावत रूग्नवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी भारतीय जनता युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
राजुरा उपविभागामधे मोठ्या प्रमाणात सीमेंट उद्योग व कोळसा खाणी आहेत. या कंपन्यांचा सामाजिक दायित्व निधी हा मोठ्या प्रमाणात असून याचा उपयोग कोविड काळात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत रुग्णसेवे करीता करण्यात यावा अशी मागणी डोहे यांनी केली आहे. सध्या राजुरा उपविभागांमधे बेड ची संख्या कमी असून कोविड रुग्नांना महाराष्ट्र सोडून तेलंगना राज्यात उपचारांसाठी जावे लागत आहे. त्यातच महाराष्ट्र -तेलंगाना प्रवासात आणि दरम्यान उपचार व्यवस्थित न मिळाल्यामुळे अनेक रुग्णाणा आपले प्राणही गमवावे लागले आहे. त्यामुळे या कम्पनी चे सी एस आर नीधीचा वापर त्वरित करून राजुरा येथे जम्बो कोविड केंद्र निर्माण करावे आवश्यक वैद्यकीय मनुष्यबळ तसेच अद्यावत सोयियूक्त रुग्नवाहीका उपलब्ध करण्यात यावे अशी मागणी चे निवेदन डोहे यांनी जिल्हाधिकारी चंद्रपुर सह हंसराज अहिर, माजी केंद्रीय ग्रूहराज्य मंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा ,आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी अर्थ ,नियोजन व वनमंत्री तथा अध्यक्ष लोकलेखा समिती महाराष्ट्र राज्य , अँड.संजय धोटे, माजी आमदार ,राजुरा व उपवीभागीय अधिकारी राजुरा यांना निवेदन दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत