Top News

पोंभुर्णा तालुक्यात जाम तुकुम गाव लसीकरणात अव्वल.

45 वर्षांवरील पात्र नागरिकांचे 100 टक्के लसीकरण.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश मामीडवार, तहसिलदार निलेश खटके यांची मोलाची भूमिका.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- कोविड-19 या महामारीचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांचे लसीकरण करण्याची मोहीम सुरु आहे. शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र अजूनही काही भागात म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. लसीकरणाच्या संदर्भात अनेक अफवा पसरल्या असून सुशिक्षित नागरिक देखील लस घेत नसल्याचे चित्र आहे.
मात्र चंद्रपुर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत जाम तुकुम यांनी दि. 12 जुन ला लसीचा पहीला डोज 97% लसिकरण केले होते. त्यानंतर ग्रामपंचायत सरपंचानी अवघ्या एक-दोन दिवसांत 100% लसिकरण पुर्ण करु असे सांगितले. दि. 14 जुन ला जाम तुकुम ग्रामपंचायतीने 45 वर्षावरील लसीकरणाचे निर्धारीत केलेल उदिष्ट पहीला डोज 100% साध्य करत एक नवा आदर्श घालून दिला आहे. जाम तुकुम ग्रामपंचायत अंतर्गत एकुण लोकसंख्या 1159 असुन त्यापैकी 45 वयोवर्षावरील असलेले नागरीक यांची एकुण लोकसंख्या 366 आहे. त्यापैकी सर्व 366 नागरीकांना कोरोना प्रतिबंध लसीचा पहीला डोज 100% झाला आहे. आदिवासी बहुल भागात लसीकरणाबाबत असलेले गैरसमज आणि अफवा यांच्यावर दक्षता समिती, ग्रामपंचायत, आरोग्य प्रशासन आणि तालुका प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे मात केली आहे.
यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश मामीडार, तहसिलदार निलेश खटके यांनी मोलाची भूमिका पार पाडली. व लसीकरण करून घेतले. याचबरोबर आरोग्य विभाग टिम, देवाडा खुर्द उपकेंद्राचे CHO गौर शहा, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका, आशावर्कर्स यांनी ग्रामपंचायत येथे 5 लसीकरण कॅम्प यशस्वी रित्या पार पाडले.
यासाठी ग्रामसेविका एन. एल. काळे, सरपंच भालचंद्र बोधलकर, उपसरपंच चिंधूजी बुरांडे, संवर्ग विकास अधिकारी मरसकोल्हे, ठाणेदार जोशी, पंचायत विस्तार अधिकारी कुरजेकर, ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी, दक्षता समिती, आरोग्य दुत, जनसेवा युवा मंडळ, सर्व महिला बचत गट, गुरुदेव सेवा मंडळ, प्रतिष्ठित नागरिक यांनी अथक परिश्रम घेतला.
         
  जाम तुकुम ग्रामपंचायत अंतर्गत एकुण लोकसंख्या 1159 असुन त्यापैकी 45 वयोवर्षावरील असलेले नागरीक यांची एकुण लोकसंख्या 366 आहे. त्यापैकी सर्व 366 नागरीकांना कोरोना प्रतिबंध लसीचा पहीला डोज 100 टक्के हे दिनांक 14 जुन 2021 रोजी ग्रामपंचायतीने उदिष्ट प्राप्त केले. तालुक्यातील सर्व गावातील नागरिकांनी लसिकरण करु घ्यावे.
डॉ. संदेश मामीडवार
तालुका वैद्यकीय अधिकारी पोंभुर्णा

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने