पर्यावरण दिनानिमित्य बार्टीतर्फे वृक्षारोपण.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बार्टी या संस्थेतर्फे तालुक्यातील चंदनखेडा येथील राजमाता माॅ माणिकादेवी क्लब ग्राऊंड आणि कोकेवाडा (मा) येथे वृक्षारोपन करण्यात आले.
या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र चंद्रपूर व शौर्य क्रिडा मंडळ चंदनखेडा यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल हनवते, समतादूत गणेश हनवते, संदिप रामटेके , शत्रुघ्न रंदये , महादेव कुरेकार ,मंगेश हनवते, माधव ननावरे, विजय खडसंग, स्वप्निल चौखे, अनिल हनवते.देवा चौखे, पंढरी हनवते, पंकज दडमल, कोकवाडा मा.येथील ग्रां.प. सदस्य रोशन मानकर, राहुल मानकर, शौर्य क्रिडा मंडळाचे सचिव स्वप्निल कुळसंगे, सदस्य राहुल कोसुरकार, विरांगना क्रिडा मंडळाचे अध्यक्ष महेश केदार, नेहरू युवा केंद्राचे माजी तालुका राष्ट्रीय युवा स्वयंसेवक आशिष सुरेश हनवते प्रामुख्याने उपस्थित होते.