Click Here...👇👇👇

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांची सावली कोविड सेंटर ला भेट.

Bhairav Diwase
कोविड योद्धांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा वि फाले, सावली
सावली:- सावली येथील कोवीड सेंटरला माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर यांनी नुकताच भेट दिली व येथील कोवीड योध्दांचा सत्कार व भेटवस्तु दिल्या.
यावेळी ता. अध्यक्ष अविनाश पाल, ता. महामंत्री सतीश बोम्मावार, माजी बांधकाम सभापती.जी.प.सदस्य.संतोष तंगडपल्लीवार, शहर अध्यक्ष आशिष कार्लेकर, प्रकाशजी खजांची, राकेश विरमलवार, प्रसाद जक्कुलवार, मयूर व्यास, साहिल संगमवार, तहसीलदार पाटील नायब तहसीलदार कांबळी, ठाणेदार सिरसाट, डॉ. बनसोड आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या दुस-या टप्प्यात संसर्ग जास्त असल्याने पाझीटिव्ह केसेसचे रुग्ण होते, अनेकांना बेड ,आक्सीजन वेळेवर मिळू न शकल्याने त्याचा मृत्यु झाला ,तरी पण पाझीटिव्ह रुग्ण न डगमगता कोरोना वर मात केले,आज दि(४ जुन) रोजी अशाच कोरोना रुग्णांची योग्य सेवा करणा-या डाक्टर,नर्स, आणि तेथील कर्मचारी योध्दांचा सत्कार करुन त्यांना भेटवस्तु देण्यात आल्या.
कोरोना काळात लोकांना मदतीचा हात देणे महत्त्वाचे असते, मास्क लावणे, सानिटायझर वापरणे, सोशल डिस्टिसिंग ठेवणे व स्वत:ची काळची घेणे,आदींचा योग्य वापर करुन कोरोनावर मात करणे यावर केंद्र व राज्य सरकार कडुन जनजागृती गेलेल्या दोन वर्षापासुन करण्यात येत आहे,याची योग्य माहीती डाक्टर ,नर्स ,व कर्मचारी लोकांकडुन दिली जात आहे व सेवा केली जात आहे ,मनात कोणतीही भिती न बाळगता सेवा करणा-या कोवीड योध्दांचा सत्कार करणे हे आद्य क र्तव्य असल्याचे यावेळीमाजी केंद्रीयमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले.