🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

योगशिक्षिका सुनीता ढुमणे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार.

आष्टा येथे योग शिबिरासाठी कु. सुनीता रमेश ढुमणे (MA योगशास्त्र) योगशिक्षिका म्हणून उपस्थित.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील आष्टा या गावात जागतिक योग दिनाचे औचित्य साधून योग शिबिराचे आयोजन हरिष ढवस यांचे नेतृत्वात करण्यात आले होते. सकाळी योग शिबिरासाठी कू. सुनीता रमेश ढुमणे MA योगशास्त्र रा. सोनापुर हि योगशिक्षिका म्हणून उपस्थित होती.

या योग शिबिरात पंचायत समिती सभापती अल्का आत्राम सभापती, माजी सरपंच हरिष ढवस, विकास दिवसे, सरपंच किरण डाखरे, उपसरपंच रमेश कुंभरे, ग्रामपंचायत सदस्या कुंदा दिवसे, ग्रामपंचायत सदस्य गिरिधर तोरे, ग्रामपंचायत सदस्य विजय बोडेकार, प्रदीप दिवसे, खुशवंत गेडाम, सूरज बोडेकर आणि गावातील लहान मुले, युवक यांनी शिबिरात प्रत्यक्ष सहभागी होऊन लाभ घेतला.
यावेळी योगशिक्षिका सुनीता ढुमणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.