Top News

उपविभागीय अधिकाऱ्यांने शेतकऱ्यांची मागितली माफी.

उर्वरित जमिनी रेल्वे प्रशासनाने अधिग्रहण करावे:- नरेंद्र जीवतोडे.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वरोरा:- चंद्रपूर जिल्ह्यात तिसरी नवीन रेल्वे लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मागील तीन वर्षापासून वर्धा सेवाग्राम बल्लारशा रेल्वेच्या लाईनचे काम वरोरा, भद्रावती तालुक्यातून सुरू आहे. या प्रकल्पामध्ये 80 टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वे प्रशासनाने अधिग्रहण करून कामची सुरुवात झाली आहे.
यामध्ये काही शेतकऱ्यांच्या अर्धा एकर ते एक एकर जमीनी शिल्लक आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कोणतीही काम करता येत नसल्याने या जमिनी सुद्धा सरकारने अधिग्रहण कराव्यात अशी मागणी भाजपाचे नरेंद्र जीवतोडे यांनी केली आहे.
भूसंपादन अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्य सुरू असून शेतकऱ्यांच्या अनेक बैठकी घेतल्या नंतर सुद्धा हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. शेतकऱ्यांची उर्वरित जमीन रेल्वे प्रशासनाने अधिग्रहण करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी रेटून धरली आहे. अशाच एका १८ जून २०२१ तारखेच्या बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी यांनी संदीप झाडे शेतकऱ्यास भुक्कड असे अर्वाच्च भाषेत संबोधले होते.
   
     त्यानंतर या विधानाचा निषेध करत किसान शेतकरी संघटने तर्फे अधिकाऱ्यांने जाहीर माफी मागावी अश्या मागणीचे निवेदन अधिकाऱ्यांस सादर केले. या निवेदनाला प्रत्युत्तर देताना उपविभागीय अधिकारी वरोरा यांनी जाहीर माफी मागितली. व त्यांच्या निवेदनातील इतर मागण्यांचे  लवकरच निराकरण करण्यासाठी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी माघार घेतली. नविन रेडी रेकनर नुसार शेतकऱ्यांना मोबदला मिळाला पाहिजे. शेती मध्ये पाण्याची सुविधा असल्यास इरिगेशन संदर्भातील वाढिव दर लागू झाला पाहिजे. अशी महत्त्वाची मागणी यावेळी निवेदनात शेतकऱ्यांनी केली होती.
यावेळी भाजपाचे नरेंद्र जीवतोडे, भगवान गायकवाड, प्रवीण ठेवणे सभापती पंचायत समिती, शेतकरी संदीप झाडे, धनंजय पिंपळशेंडे, बंडू बल्की आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने