जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏

✌️

साखरवाही येथील जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक धनराज विरुटकर यांचा सेवापुर्ती सोहळा संपन्न.

विद्यालयास मानाचे स्थान मिळवून देण्याचा प्रयत्न- धनराज विरुटकर यांचे प्रतिपादन.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- सोमवार 31 मे रोजी आपल्या सेवेचे 29 वर्ष पूर्ण केल्यानंतर साखरवाही येथील जनता विद्यालयाचे मुख्यध्यापक धनराज विरुटकर सरांना जनता विद्यालयाचे वतीने निरोप देण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री वामनरावजी खंगार ज्येष्ठ शिक्षक तसेच प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री मोहनराव गंधारे सर माजी मुख्याध्यापक तसेच नुकतेच रूजू होण्यासाठी उपस्थित असलेले मुख्याध्यापक माननीय श्री बंडूजी लांडे सर उपस्थित होते.
सत्कार मूर्ती माननीय श्री धनराज विरुटकर सर यांचा सत्कार उपस्थित पाहुण्याच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन करण्यात आला.
श्री मोहनराव गंथारे सर यांनी शाळेचे मुख्याध्यापक पद हे कायम टिकवून ठेवण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहिलो मला आणखी कालावधी मिळाला असता तर आपण या शाळेचा आणखी विकास झाला असता असे मनोगत व्यक्त केले.
सरांना समाजकार्याची फार आवड आहे त्यांनी भद्रावती पंचायत समितीचे दोन वर्ष सभापती पद भूषविले परंतु ते आपल्या अध्यापनाच्या कार्यापासून कदापिही दूर गेले नाही .मला वाटते त्यांना आणखी दोन वर्षाचा कालावधी मिळाला असता तर या विद्यालयाला एक मानाचे स्थान मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता असे मला वाटते असे सत्कारमूर्ती धनराज विरुटकर सर यांनी प्रतिपादन केले.
नव्यानेच रुजू होण्यासाठी उपस्थित असलेले माननीय श्री बंडुजी लांडे सर यांनी सुद्धा सरांना पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या.मला शाळेविषयी फार मोठे प्रेम आहे परंतु मला जनता विद्यालय वणी येथे मुख्याध्यापक होण्याची इच्छा होती.परंतु मला चांदा शिक्षण मंडळाचे सचिव माननीय श्री अशोक भाऊ जिवतोडे दोन महिने का होईना मला संधी दिली है ॠण मी कधीही विसरू शकत नाही.तेव्हा विद्यालयात वूक्षा रोपन करून एक सुंदर परिसर निर्माण व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली.सरांनी भद्रावती पंचायत समितीचे सभापती असतात अनेक नाविन्यपूर्ण योजना राबवून आपला दोन वर्षाचा कार्यकाळ सामान्य जनतेच्या सेवेत घालविला. तेव्हा सरांना सामान्य माणसाबद्दल आस्था असल्याने तसेच ते जगन्नाथ महाराजांचे भक्त असल्याने त्यांना सामान्य माणसाबदल जाण होती .तेव्हा अशा सरांच्या सेवापुर्ती सोहळायाला उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो असे ते म्हणाले.
यावेळी साखरवाही जनता विद्यालयाचे शिक्षक श्री. विवेक बोढे सर श्री .अजय आगलावे सर श्री .ओम प्रकाश पिंपरे सर हे उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री परशुराम येडे सर यांनी केले तर संचालन श्री बंडू बर्डे सर तर आभार प्रदर्शन श्री रवींद्र जेनेकर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी श्री .घनश्याम काकडे श्री .पंकज कोंकमवार श्री. अनुप वंदनलवार श्रीमती निर्मला ताई बोबडे यांनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत