Top News

शिवसेना नेते बबन उरकुडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धान्यकिट वाटप.

भुरकुंडा बु. सुकूडपल्ली आणि साखरवाही येथे गरजू कुटुंबांना दिला आधार.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- तालुक्यातील शिवसेनेचे कर्तव्यनिष्ठ, सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारे नेते म्हणून ओरखल्या जाणारे शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख बबनराव उरकुडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या वाढदिवसानिमित्य तालुक्यातील पाचगाव-आर्वी क्षेत्रातील भुरकुंडा, सुकूडपल्ली आणि साखरवाही येथे गरजू लोकांना धान्यकीटचे वाटप करण्यात आले. तालुक्यात शिवसेनेच्या माध्यमातून सतत सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेले बबन उरकुडे यांनी या प्रसंगातून समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. कोरोनाच्या काळात त्यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोणताही उडाव खर्च न करता त्याच पैस्याच्या बदल्यात केलेले हे कार्य उल्लेखनीय आहे.


स्वतःच्या नेतृत्वला अश्या उपक्रमातून आणि शिवसेनेच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ब्रीदवाक्याला समर्पक अशे काम करून त्यांनी नेहमीच स्वतःला सिद्ध केले आहे.
स्वतःच्या कार्यातून तालुक्यात नाव लौकिक कमवताना हे नेतृत्व पुन्हा पुन्हा उभारतांना दिसत आहे. कोरोना काळात तालुक्यातील जनतेचि कोणतीही समस्या असली तरी 24 तास काम, लोकांचे फोन उचलून त्यांच्या समस्या सोडवणे अश्याप्रकारे जनतेची नाळ जोडून ठेवणारे नेते म्हणून तालुक्यात त्यांचे नाव लौकिक होत आहे.
आजच्या प्रसंगी शिवसेनेचे नेते राजेंद्र डोहे, निलेश गंपावार,रमेश झाडे, बंटी मालेकर,बालुभाऊ कुंटे,मनोज कुरवटकर, प्रवीण मोरे, गणेश चोथले, सूर्यवंशी, समिर शेख आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने