💻

💻

गोरजा येथील ग्राम पंचायत भवनाची इमारत त्वरीत दुरुस्त करा.

सरपंच व उपसरपंचाची मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील गोरजा ग्राम पंचायत भवनाची इमारत जीर्ण झाली असून ती त्वरीत दुरुस्त करण्यात यावी,अशी मागणी गोरजा ग्रामपंचायतीचे सरपंच अरुण टेकाम आणि उपसरपंच श्रावणी प्रफुल्ल घोरुडे यांनी केली आहे.
सन १९६१ मध्ये उभारण्यात आलेली गोरजा ग्राम पंचायत भवनाची इमारत आता जीर्ण झालेली आहे.प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनसुद्धा अजुनपर्यंत सदर इमारतीकडे कोणीही लक्ष दिले नाही. इमारत जीर्ण झाल्यामुळे कोणतीही जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिवीत हानी झाल्यास त्याला जबाबदार कोण ? असा प्रश्नही सरपंच आणि उपसरपंचांनी उपस्थित केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत