💻

💻

खाजगी रुग्णालयांकडून जनतेची लुट थांबवा.


आम आदमी पार्टीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- खाजगी रुग्णालयांकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करुन जनतेची होत असलेली लुट थांबविण्यात यावी व शासकीय रुग्णालये सक्षम करण्यात यावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या भद्रावती तालुका शाखेतर्फे येथील तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
‌ निवेदनात म्हटले आहे की, कोविड काळात खरे योद्धे म्हणजे डाॅक्टर, स्टाॅफ सर्व ठिकाणी उत्तम सेवा देत आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे आपण या महामारीला तोंड देऊ शकत आहोत. परंतू काही ठिकाणी हाॅस्पिटल व्यवस्थापन जनतेला लुबाडत आहेत. असाही अनुभव जनतेस येत आहे. परवा नाशिक येथे गरीब रुग्णाला न्याय देण्यासाठी स्थानिक वाकहार्ड हाॅस्पिटलमध्ये आम आदमी पार्टीकडून केलेल्या आंदोलनामुळे गरीबाला त्याची अनामत रक्कम परत मिळाली. 

परंतू स्थानिक पोलिस प्रशासनाने नाशिकमधील खाजगी रुग्णालयाच्या दबावाखाली येऊन आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्याविरोधात गुन्हे दाखल केले. सरकार जनतेला न्याय देत नाही आणि न्याय मिळवून देऊ पाहणा-या सज्जन, अहिंसक आंदोलकांवर गुन्हे दाखल करीत आहे. या घटनेचा आम्ही राज्यभर निषेध करीत आहोत. असेही निवेदनात म्हटले आहे. शिवाय निवेदनात विविध मागण्यादेखिल करण्यात आलेल्या आहेत. निवेदन सादर करताना सोनल पाटील, विनीत निमसरकर, सूरज शहा, किशोर गायकवाड, सूरज पेंदोर आणि बंग आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत