१० किमी रस्त्यात खड्डेच खड्डे; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष.
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- जयरामपूर ते येनापूर या १५ किमी लांबीच्या रस्त्यावर १० किमी परिसरात ठिकठिकाणी पडलेल्या जीवघेण्या खड्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवण्याची वेळ आली आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षापासून सदर रस्त्यावर खड्डे पडलेले असून सुद्धा प्रशासन सदर मार्गावर कानाडोळा करीत आहे. या १० किमी अंतरावर नागरिकांना दररोज ये -जा करावे लागते. बँक, बाजार इत्यादी कामे घेऊन लोक येनापूर ची वाट पकडता; परंतु सदर रस्त्याने खूप मोठ मोठे जीवघेणे खड्डे पडून असल्याने सदर रस्ताने जाण्यास नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या मार्गाकडे दुर्लक्ष झाल्याने हा मार्ग अपघातला कारणीभूत ठरत आहे. हा मार्ग येनापूर घाटकुळ ते गोंडपिपरी व पोंभुर्णा मार्गे जात असल्याने या मार्गाची खूप मोठी वर्दळ असते मालवाहतूक वाहन सेवा ये-जा करतात त्यांना मात्र या १० किमी अंतरावर वाहन चालविताना खूप मोठी कसरत करावी लागते हे त्यांनाच माहित सदर रस्त्याच्या मागणीची दखल घेत कमीत कमी खड्डे दुरुस्तीचा तरी मुहूर्त पावसाळ्यापूर्वी निघेल ही अपेक्षा होती. परंतु तीही अपेक्षा पूर्ण होण्याचे चिन्ह दिसत नाहीत.
तरी सदर मार्गाकडे प्रशासनाने लक्ष देऊन लवकरात लवकर सदर मार्ग दुरस्ती करावा असी मागणी वाहन धारकाकडून व नागरिकाकडून होत आहे.