जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏

✌️

11 हजारांची सुपारी देत दुर्गापुरात हत्या. #Murder #Arrested


24 तासांच्या आत आरोपींना ठोकल्या बेड्या.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- ११ जुलै रोजी जमनाबाई गंजीर हिचे बंडू संदोकार याच्याशी जागेच्या कारणावरून भांडण झाले. त्याचा राग मनात ठेवून तिने मुलगा उमेश गंजीर याच्यासोबत संगनमताने बंडू संदोकारची हत्या करण्याचा कट रचला. दोघांनी करण डोंगरे व शंकर हनुमान तुकाराम याला बंडूला मारण्यासाठी ११ हजार रुपयांची सुपारी दिली. बंडू कवडू संदोकार, रा. वॉर्ड क्रमांक १ दुर्गापूर, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी आई-मुलासह अन्य दोन जणांना अटक केली आहे. जमनाबाई शत्रुघ्न गंजीर (५२), उमेश शत्रुघ्न गंजीर (२२), दोघेही रा. बाबूपेठ, करण किसन डोंगरे (२१), रा. बगड खिडकी, शंकर हनुमान तुमराम (२१), रा. महाकाली वॉर्ड, चंद्रपूर, असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. #Murder #Arrested
या दोघांनी शनिवारी बंडूचे घर गाठून त्याला दारू पाजली. मद्यधुंद अवस्थेत बंडूच्या तोंडात दुपट्टा कोंबून सेंट्रिंगच्या तारेने त्याचा गळा आवळला. त्याचा मृतदेह तेथेच ठेवून दोघांनी पळ काढला. बंडूचा मृतदेह पडून असल्याची माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळताच ठाणेदार स्वप्नील धुळे व त्यांचा चमू घटनास्थळी दाखल झाला. मृतदेह संशयास्पद आढळून आल्याने त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून २४ तासांच्या आत चार जणांना अटक केली. चारही जणांविरुद्ध कलम ३०२, १२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्या नेतृत्वात सपोनि रोशन बावणकर, पोउनि प्रवीण सोनाने, पोउनि किशोर सहारे, सुनील गौरकार, अमोल घोरुडे, रवींद्र धुर्वे, मनोहर जाधव, संतोष आडे, योगेश्वर कौरासे, सूरज लाटकर आदींनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत