Click Here...👇👇👇

संकटकालिन परिस्थितीत जीवाची पर्वा न करता समाजसेवेचा वसा जोपासून मदत करणारा आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया.

Bhairav Diwase

चिमूर विधानसभा क्षेत्रात अनेक वर्षांनंतर राष्ट्रसंताच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतील भूमिपुत्र, राष्ट्रसंत व महापुरुषांच्या विचारावर चालणारे समाजसेवक आमदार बंटीभाऊ भांगडीया आमदार म्हणून जनतेच्या सेवेत आले. नेहमी रुग्ण सेवा, वैद्यकीय सेवा, शैक्षणिक सेवा, औद्योगिक सेवा अनेक अडचणींना आर्थिक मदत असे समाजकार्य त्यांचे हातून घडत आहेत त्यामुळेच चिमूर विधानसभा क्षेत्रातील जनतेनी त्यांना पुन्हा  निवडून देत दुसऱ्यांदा आमदार म्हणुन समाजसेवेची संधी दिली.
    अनेक समाज कार्याच्या नंतर आता प्रत्येक्षात त्यांचे अंगी असलेला अवलीया अनुभवला ब्रम्हपुरी तालुक्यातील गावांमध्ये सुलतानी महापुराचे संकट कोसळले एकीकडे पुराचे संकट तर दुसरीकडे कोरोना महामारीची भीती अशा अनेक संकटात अनेक लोकप्रतिनिधी आपआपल्या घरात बसून होते मात्र आमदार बंटीभाऊ हे प्रत्यक्ष पूर परिस्थिती आलेल्या गावात जाऊन आढावा घेत होते संपूर्ण गावात पाणी संपूर्ण गावात महापुराचे भयानक दृष्य पाहतांनीच अंगावर शहारे येत होते.
 मात्र त्याही परिस्थितीत समाज सेवेचा वासा जोपासणारे अवलीया आमदार बंटीभाऊ हे इंजिन बोटीच्या सहाय्याने पाण्यात दौरा करत होते. संपूर्ण हजारो पूरग्रस्त नागरीकांची आमदार बंटीभाऊ यांनी राहण्याची, भोजनाची, शाल, भांडी, ताळपत्री यांची व्यवस्था पुरविली जिथे शासन निष्क्रिय झाले तिथे आमदार बंटीभाऊ यांनी सक्रिय होऊन  सेवा केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेत सांगतात की खरा पुढारी कोण संकटात जो आपल्या जीवाची पर्वा न करता संपूर्ण कसोटी पणाला लावून संजकार्य करतो तोच खरा पुढारी

अहो पुढारीपण कशाला|
सेवा गावाची करावयाला| 

आदी लावा की कसोटी पणाला|
समजेल कोण पुढारी तो

  राष्ट्रसंत ग्रामगीतेत म्हणतात की समाज कार्य करतांना अनेक उणीवा पूर्ण करतो तो खरा समाज सेवक परंतु संपूर्ण उणिवांची पूर्तता करून संकटात धावून येणारा मी प्रत्येक्षात पाहिलेला व अनुभवलेला अवलीया म्हणजे चिमूर विधानसभा क्षेत्राचे विकासपुरू,कर्तव्यदक्ष आमदार किर्तीकुमार बंटीभाऊ भांगडीया यांचा आज वाढदिवस....

आमदार किर्तीकुमार बंटीभाऊ भांगडीया यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा ....


 
Tags