हा तर प्रसिद्धीसाठी भाजपच्या नावाचा केविलवाणा वापर:- निंबाळकर. #chandrapur

Bhairav Diwase

राज यादव भाजयुमो मध्ये नव्हतेच...

चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी आज देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपाला काही नकारात्मक म्हंटले की त्याची दखल नको ते देखील घेतात. मग अश्या कुरखोडी पासून काँग्रेस कशी अलिप्त राहील? प्रसिद्धी मिळावी म्हणून आता भाजपच्या नावाचा वापर काँग्रेसला करावा लागत आहे. राज यादव भाजयुमोचे कधीच न्हवते तरीही ते भाजयुमो सोडून काँग्रेस मध्ये आले. अशी बतावणी करणे म्हणजे प्रसिद्धीसाठी भाजपच्या नावाचा वापर करणे आहे. अशी स्पष्ट प्रतिक्रिया भाजयुमो महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर दिली. #chandrapur

शनिवार(17,जुलै) ला बाबूपेठ येथील एका कार्यक्रमात राज यादव नामक युवकाने काँग्रेस मध्ये प्रवेश घेतला असे म्हंटले जाते. हा युवक भारतीय जनता पार्टीच्या युथ विंग म्हणजे भाजयुमोचा होता असे माध्यमांना सांगण्यात आले. मुळात दुरान्वये राज यादव यांचा भाजयुमो सोबत काहीच संबंध नाही. काँग्रेसने प्रसिद्धीसाठी भाजपचा वापर करू नये. पक्ष मजबूत करण्यासाठी पक्ष प्रवेश घेतले जातात. पण माध्यमांना चुकीची माहिती देऊन प्रसिद्धी करून घेणे योग्य नाही. अश्या खोट्या प्रचाराला जनता बळी पडणार नाही, अशी स्पष्टोक्ती निबाळकर यांनी दिली आहे.