🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

भाजयुमोची अकोला कृषी विद्यापीठावर धडक. #Agriculture #Beat


राज्यातील 6420 कृषी पदविकेच्या विद्यार्थ्यांना कृषी पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यासाठी ठिय्या..!!

शिक्षण संस्थांचे खिसे भरण्यासाठी केली राज्यातील 6420 विद्यार्थ्यांची फसवणूक.

भाजयुमो प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांचा आरोप.


(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे
अमरावती:- कृषी क्षेत्रात भविष्य घडविण्यासाठी धडपड करणाऱ्या कृषी पदविकेच्या सहा हजार विद्यार्थ्यांवर शिक्षणात खोडा घातला आहे. राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषद आणि महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कृषी तंत्र निकेतन (वर्ष ३) विद्यार्थ्यांंना या वर्षी कृषी पदवीला प्रवेश नाकारण्यात आला आहे. यामुळे या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणावर बंदी आणल्याचा व या एका बॅचवर विशिष्ट प्रकारे अन्याय करत असल्याचा आरोप भाजयुमो प्रदेश सचिव सोपान कनेरकर यांनी केला आहे. #Agriculture #Beat

कृषि तंत्र निकेतन २०१८-२०२१ बॅचच्या विद्यार्थ्यांना कृषि पदवी या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी कृषि तंत्र निकेतनचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. अशा विद्यार्थ्यांना कृषि पदवीच्या थेट पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यानी दहावी च्या बेस वर पदविका अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तेही पदवीला प्रवेश मिळावा म्हणून त्यांच्या शिक्षणाला खंड लागणार.
सन २०१७-२०२० या शैक्षणिक वर्षात ज्या विद्यार्थ्यांनी कृषि तंत्र निकेतन हा अभ्यासक्रम पूर्ण करुन कृषि पदवीच्या थेट दुसऱ्या व पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम व सन २०१८-२०२१ या बॅचच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा समान आहे. तरीसुद्धा २०१८-२०२१ या बॅचच्या विद्यार्थ्यांना कृषि पदवीच्या पहिल्या व दुसऱ्या वर्षासाठी प्रवेश नाकारण्यात येत आहे.

प्रवेश माहिती पुस्तिकेत कृषि पदवीच्या थेट पहिल्या व दुसऱ्या वर्षात प्रवेश नसल्याची माहिती असली तरी काही कॉलेज नि विद्यार्थ्यांना प्रवेश पुस्तिका दिल्याच नाही व त्यांना भ्रमात ठेवून प्रवेश करून घेतले.

अभियांत्रिकी शाखेतील शिक्षणाप्रमाणेच कृषी पदविका केल्यास कृषी पदवीच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश मिळत असल्यामुळे दहावी नंतर विद्यार्थी कृषी पदविकेला प्रवेश घेतात. परंतु आता या विद्यार्थ्यांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. प्रवेश माहिती पुस्तकात जरी पदवीच्या दुसर्‍या वर्षात प्रवेश नाकारल्याची माहिती असली तरी हे प्रवेश माहिती पुस्तक विद्यार्थ्या पर्यन्त पोहचलेच नाही. किंवा विद्यार्थ्यांचे खिसे खाली करण्यासाठी तर असे केले नसेल असा प्रश्न देखील सोपान कनेरकर यांनी उपस्थित केला.


३ वर्ष अर्ध इंग्रजी माध्यमाची ही शेवटची बॅच असून या नंतर हा अभ्यासक्रम पूर्णपणे बंद होणार आहे. ही शेवटची बॅच असल्यामुळे विद्यार्थ्यांची अशी मागणी आहे की त्यांना पदवी ला प्रवेश मिळावा पण हा हक्क त्यांच्या कडून काढून घेतला. २०१८ चे सिनियर आणि जुनियर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. मग या विद्यार्थ्यांवर का अन्याय होत आहे. जर तुम्हाला पदवीला अ‍ॅडमिशन द्यायच्या नव्हत्या तर तुम्ही तेव्हाच हा कोर्स बंद का नाही केला. विद्यार्थ्यांना प्रवेश का दिले ?. का विद्यार्थ्यांचे नुकसान केले का ते फक्त तुमच्याच फायद्यासाठी अ‍ॅडमिशन दिले ?.
ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रवेश पुस्तकाकडे नाही तर कॉलेज बघून नाही तर फॅसिलिटी व शिकवण पाहून अ‍ॅडमिशन घेतात. राज्यातील मोठ्या प्रमाणात महाविद्यालयांनी प्रवेश पुस्तके बद्दलची माहिती प्रवेश घेण्याच्या वेळेस दिली नव्हती. यावरुन विद्यार्थ्यांची फसवणूक झाली का असे पालकांना वाटत आहे.
राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील १०७ कृषी तंत्र निकेतन मधील जवळपास ६४२० विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तरी पण प्रशासनाने कान बंद करून ठेवले आहे. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, राजेश निनाळे, अनुप गोसावी, किरण अवताडे,राजेश निनाळे,अभिजित बांगर,निलेश काकड,अमोल पिंपळे. सुयोग देशमुख,उज्वल बामनेट,अक्षय जोशी,हमेंद्र सुनारीवाल,टोनी जयराज,अभिजित भगत, अविनाश जाधव,नितीन राउत,अनुप गोसावी,ऋषिकेश अंजनकर,अमोल तालोकर,मंगेश झिने,शिवम बळापुरकर आदी उपस्थित होते.