वीज पडून महिला-पुरुष व बकऱ्या ठार दोघे गंभीर जखमी. #Lightningstrikes

Bhairav Diwase
मुल:- अर्ध्या तासापूर्वी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली, आणि होत्याचं नव्हतं करून टाकले. जोरदार पावसाच्या सरींचा सह विजांचा कडकडाट झाला आणि दोन जणांना जीवास मुकावे लागले लागल्याची घटना नुकतीच बेंबाळ पोलीस दूर क्षेत्राच्या हद्दीत जुनगाव ते घोसरी मार्गावर घडली. या घटनेत एक महिला व एक पुरुषां सहित काही बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
 विलास केशव नागापुरे (५०) व गयाबाई पोरटे (६०) रा. बोंडाळा खुर्द असे दुर्दैवी मृतकाचे नांव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार असे कळते की दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाची सुरुवात झाली पावसापासून बचाव करण्याच्या हेतूने सदर चारही व्यक्तींनी जुनगाव ते घोसरी रोडवर असलेल्या झाडामध्ये आसरा घेतला तेवढ्यातच त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि वीज कोसळली या दुर्घटनेत दोघे ठार तर दोघे जखमी आणि शेळ्या मृत्युमुखी पडल्या असून घटने मुळे परिसरात हळहळ होत आहे.

#Lightningstrikes #mulnews #mul #death