पोंभुर्णा तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी रोशन ठेंगने यांची नियुक्ती. #Pombhurna

भारतीय जनता पार्टी पोंभुर्णाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- रोशन ठेंगने हे पोंभुर्णा तालुक्यातील राजकीय व सामाजिक क्षेत्रातिल परिचित व्यक्तिमत्व. गावातील गोर, गरीब जनतेच्या अडचणी‌ तसेच सामान्यांच्या मदतीला सदैव धाऊन जाणारे व्यक्ति म्हणून रोशन यांची ओळख. अशाच मनमिळाऊ व्यक्तिमत्वावाची पोंभुर्णा तालुक्याच्या सरपंच संघटनेचे अध्यक्षपदी निवळ करण्यात आली. #Pombhurna
त्याबद्दल भारतीय जनता पार्टी पोंभुर्णाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांच्या पुढिल वाटचालीसाठी शुभेछा देण्यात आल्या. यावेळी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा कु.अल्का आत्राम, उपसभापती ज्योती बुरांडे, प. स. सदस्य विनोद देशमुख, प. स. सदस्य गंगाधर मडावी, ईश्वर नैताम, महामंत्री हरीश ढवस, महामंत्री ओमदास पाल, शहराध्यक्ष ऋषी कोटरंगे, भाजयुमो तालुकाध्यक्ष अजय म्हस्के, नैलेश चिंचोलकर, माजी नगराध्यक्षा श्वेता वनकर, माजी नगरसेवक सुनीता मैकलवार, बंडू बुरांडे , दिलीप मैंकलवार, राहुल पाल, रंजीत पिंपडशेन्डे, विनोद कानमपलीवार, अमोल मोरे, राजू ठाकरे इत्यादि यावेळेस उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत