Top News

जीरो माइल आईकन अवॉर्ड वितरण. #Award

मिळणारा सन्मान हा प्रेरणादायी ठरतो- प्रा.महेश पानसे


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
नागपूर:- मिळणारा समान व विवीध क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल हाेणारे कौतुक हे भविष्यात प्रेरणादायी ठरते व यातून आपली सामाजीक जबाबदारी अधिकाधिक व्यापक होत असते. कौतुकातून कर्तृत्वाची क्षमता वाढीस लागून व्यक्ती सामाजीक कार्य करण्यास प्रेरीत होतो हे विचार राज्य पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांनी जीरो माइल आइकन अवॉर्ड वितरण समारंभात प्रमुख अतिथी म्हणून व्यक्त केले.
नागपूरातील हॉटेल हेरीटेज येथे जीराे माईल फाऊंडेशन द्वारा राष्ट़ीय हिंदी साप्ताहिक जीरो माइलचे १५ वे स्थापणा दिनानिमीत्य भारतभरातून अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामी व्यक्तींचा जीरो माइल आइकन अवॉर्ड देवून सम्मानित करण्यात आले. 


दोन सत्रात आयोजीत कार्यक्रमातील प्रथम सत्रात पूर्व मंत्री रमेशचंद्र बंग, नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी, शिक्षण महषीं राजाभाऊ टाकसांले, राष्टभाषा समिती पुणे चे नागपूर विभाग अध्यक्ष अजय पाटील, राष्टवादी का़ग़ेस पार्टी उपाध्यक्ष अनिल अहिरकर, जलभुषण अवॉर्ड विजेता प्रविण महाजन, सिने अभिनेता रवींद्र अरोडा, प्राचार्य चंदनसिंह रोटेले, शिबा रिफलेक्शन एवंम जनकल्याण समिती चे डायरेक्टर् राकेशकुमार जैफ आदी गणमान्य उपस्थित होते. या प्रसंगी आइकन अवाडं विजेतांचे कार्याची महती विषद करणाऱ्या मोहक विशेषांकाचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले.
समारंभाचे द्वितीय सत्र विचारमंच  रुपात  नियोजीन करण्यात आले होते. या विचारमंचावर प्रमुख अतिथी म्हणून राज्य पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा.महेश पानसे सहित प्रीतपालसिंह भाटीया, एड.डॉ.फिरदोस श्रॉफ, समिर सराफ, प्रकाश हेडाऊ, सच्चानंद लालवानी आदी विवीध क्षेत्रातील व्यक्तीनी विचार व्यक्त केले. व आयोजीत आइकन अवॉर्ड चे उददे्शाची सराहना केली. या प्रसंगी भारतभरातून पन्नासावर विशेष व्यक्तींना जीरो माइल आइकन अवॉर्ड देवून सन्मानीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिरो माइल फाऊंडेशनचे संचालक तथा संपादक आनंद शर्मा यांनी तर सुरेल संचालन मोहम्मद सलीम यांनी केले. #Award

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने