पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथील स्व. मनोज यादव उपरे (वय ३१ वर्ष) दि. २३ जुलै २०२१ ला मृत्यू झाला. घरचा कमवता पुरुष गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट तुटून पडले. त्यांच्या मागे दोन लहान मुली व पत्नी असा संसार सोडत ते देवाघरी गेले. स्व.मनोज उपरे हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर होते नेहमी समाजासाठी काहीतरी करून आपले जीवन आनंदात जगू असे स्वप्न बाळगणारे आज आपल्यात नाही. त्यांच्या कुटुंबावर किती मोठे संकट निर्माण झाले याची जाणीव लक्षात घेऊन उमरी पोतदार येथील सामाजिक संस्था "पाहणारे डोळे आणि मदतीचे हात" बहुद्देशीय सामाजिक संस्था ही समोर येऊन त्या गरजू कुटुंबाला दुःखातून सावरण्यास मदत म्हणून लोकवर्गीणीतून व सोशल मीडियाचा वापर करीत फोने पे / गुगल पे च्या माध्यमातुन पैसा गोळा करण्यात आला. #Pombhurna #Adharnewsnetwork
या संस्थेच्या कार्याची दखल घेत दि. 26 जुलैला माजी कॅबिनेट मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेत जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार यांना फोन करून उपरे कुटुंबाला तात्काळ मदत करण्यास सांगितले. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल संतोषवार यांनी लगेच या संस्थेच्या पदाधिकऱ्यांशी भेट घेतली आणि त्या परिवाराला प्रत्यक्ष गृहभेट देऊन ५००१ रु. आर्थिक मदत करण्यात आली. परिवाराला शासकीय योजना मिळवून देण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या कडून ५००१ रू ची आर्थिक मदत करण्यात आली. स्व. मनोज उपरे यांच्या लहान मुलीचा ६ ऑगस्ट ला वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या वतीने वाढदिवस साजरा करून "पाहणारे डोळे आणि मदतीचे हात" बहुद्देशीय सामाजिक संस्था यांनी लोकवर्गणीतून जमा केलेली रोख रक्कम ३०,९९१ रुपये/- त्या कुटुंबाला सुपूर्त करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अंकुश उराडे, संदिप यम्पलवार, निखिल झबाडे, अमित कुमरे, निखिल झुरमुरे, भिमराव मेश्राम, अविनाश लेनगुरे, तेजराज सिडाम, चंद्रकांत सिडाम, नदिम कुमरे, विक्रम लेनगुरे, मनिष ठाकरे, चेतन कावळे, अंकुश लेनगुरे, महेश कुळमेथे उपस्थित होते.