जाहिरात... Advertisement... विज्ञापन

वाघाच्या हल्ल्यात इसम जखमी. #Attack

मुल तालुक्यातील घटना.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
मुल:- मुल तालुक्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्र उपक्षेत्र मूल , दहेगाव नियतक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कवड़पेठ येथील श्री दिवाकर ढिवरु भेंडारे (वय 50 वर्ष ) हा दि . 20/09/21 रोजी कवड़पेठ गावालगत असलेल्या कक्ष क्र,517 मधे गुरे चारत असताना दुपारी अंदाजे 3.30 वाजता च्या दरम्यान वाघाने हल्ला करून दिवाकर भेंडारे यांना किरकोळ जखमी केले.
सदर व्यक्तीला गावातील गुराखी यांनी उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय मूल येथे   प्राथमिक उपचार करुण घेण्यासाठी आणण्यात आले. प्राथमिक उपचार करुन  पुढील उपचारकरिता  वनपरिक्षेत्र अधिकारी चीचपल्ली  कु. प्रियांका वेलमे मॅडम यांच्या नेतृत्वात क्षेत्रसहाय्यक प्रशांत खणके, यांनी स्वतःहा पुढाकार घेऊन वनरक्षक राकेश गुरनुले, यांच्या सहकार्याने  जखमी रुग्णाला चंद्रपूर येथे हलविण्यात  आले. उपजिल्हा रुग्णालयात प्राणी मित्र उमेशसिंह झिरे व इतर प्राणीमित्र यांचेसह वरक्षक मानकर व गावकरी उपस्थित होते.
 
      जखमी रुग्ण दिवाकर किरकोळ स्वरूपात जखमी असल्याचे सांगण्यात आले असले तरी वनविभागाच्या वतीने जखमी रुग्णांची देखभाल करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. याआधी आठ महिन्यांपूर्वी कावडपेठ येथील जंगलात  गुरनुले नामक इसमावर  वाघाने हल्ला करुन ठार केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत